स्तोत्रसंहिता १२५
विश्वासूंची चिरस्थायी सुरक्षितता १–३
१
प्रवाशांचे आराधना गीत. ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.
२
यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.
३
नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही, नाहीतर नीतिमान लोकही त्यांच्या हाताने दुष्टता करतील.
दुष्टांवर घातलेली मर्यादा ४–५
४
हे याहवेह, जे नीतिमान आहेत, ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा.
५
परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Study note