स्तोत्रसंहिता१२१
Listen to this chapter
0:00
0:00
तीर्थयात्रीची वर पाहणारी दृष्टी
१
प्रवाशांचे आराधना गीत. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो— मला साहाय्य कुठून येईल?
२
स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह, तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.
झोप न घेणारा रक्षक
३
ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.
४
खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत.
५
याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात— याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत.
६
दिवसाच्या सूर्याची तुला बाधा होणार नाही, आणि रात्रीच्या चंद्राची देखील नाही.
सनातन व सर्वांगीण संरक्षण
७
याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील— आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील.
८
तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे, यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note