स्तोत्रसंहिता ११३
सार्वत्रिक व सनातन स्तुतीचे आवाहन १–३
१
याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा.
२
याहवेहच्या नामाचे स्तवन होत राहो, आता आणि सदासर्वकाळ.
३
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, याहवेहच्या नामाचे स्तवन होवो.
देवाचे अतुलनीय वैभव व परात्परता ४–६
४
याहवेह सर्व राष्ट्रांहून उच्च आहेत; त्यांचे गौरव गगनमंडळाहून उंच आहे.
५
आमचे परमेश्वर याहवेह, यांच्या समान कोण आहे, जे सर्वोच्च स्थानी सिंहासनावर विराजमान असतात,
६
जे वरून ओणवून, गगनमंडळ आणि पृथ्वीचे अवलोकन करतात?
गरीबांविषयी देवाची नम्रता व काळजी ७–९
७
ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्यातून वर उचलून घेतात;
८
ते त्यांना राजपुत्रांबरोबर, आपल्या प्रजेच्या प्रधानांसह बसवितात.
९
ते निपुत्रिक गृहिणीला तिच्या घरात स्थिरावतात, आणि तिला मुले देऊन आनंदी माता बनवितात. याहवेहचे स्तवन करा.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Study note