Skip to content
जखऱ्याह १२:१

जखऱ्याह १२:१

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
एक भविष्यवाणी: इस्राएलच्या बाबत याहवेहचे वचन. याहवेह, ज्यांनी आकाश विस्तारले, पृथ्वीचा पाया घातला आणि मनुष्यांच्या अंतर्यामी आत्मा घातला, ते जाहीर करतात:
“मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल.
त्या दिवशी, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे एकत्र होतील, तेव्हा मी यरुशलेमला हालविता न येणारा खडक करेन. जे तिला हालविण्याचा प्रयत्न करतील, उलट ती राष्ट्रेच घायाळ होतील.
त्या दिवशी, मी प्रत्येक घोड्याला भयचकित करेन व त्याच्या स्वारांची मति भ्रष्ट करेन. मी यहूदीयाच्या लोकांवर लक्षपूर्वक नजर ठेवेन, पण इतर राष्ट्रांना आंधळे करेन,” असे याहवेह जाहीर करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options