Skip to content
तीता १:५-९

तीताच्या सेवाकार्याचा उद्देश

तीता १:५-९
मी तुला क्रेता बेटावर सोडले, जेणे करून तू तेथील उर्वरित कार्याची संपूर्ण व्यवस्था करावी आणि माझ्या आज्ञेनुसार प्रत्येक नगरात मंडळीचे वडील नेमावे.
जो निर्दोष आणि एकाच स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वासणारी असून त्यांच्यावर दुराचाराचा व ती अवज्ञा करणारी असल्याचा आरोप नसावा.
अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत.
ते पाहुणचार करण्याची आवड असणारे, चांगल्या गोष्टींवर प्रेम करणारे, इंद्रियदमन करणारे, सरळ, पवित्र आणि शिस्तबद्ध असावे.
त्याने शिकविल्याप्रमाणे विश्वासू संदेश दृढपणे धरून ठेवले पाहिजे, जेणेकरून ते चांगल्या शिकवणीने इतरांना प्रोत्साहन देणारे आणि जे विरोध करतात त्यांचे खंडन करणारे असावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options