Skip to content
गीतरत्न ३:११

वैभवशाली राजाकडे पाहा

गीतरत्न ३:११
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ११ दाखवत आहे.
ते सर्व धनुर्धारी, आणि युद्धात अनुभवी आहेत. रात्री होणार्‍या आतंकासाठी सज्ज असलेले, प्रत्येकाने आपली तलवार सोबत घेतली आहे.
शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे.
१०
त्याचे खांब चांदीचे आहेत, त्याचे तळ सोन्याचे आहे. त्यातील बैठक जांभळ्या वस्त्रांची आहे, तिच्या आतील भागाला यरुशलेमच्या कन्यांनी प्रेमाने वेलबुट्टीने मढविले आहे. यरुशलेमच्या तरुणीकडून प्रेमपूर्वक भेट.
११
अहो सीयोनच्या कन्यांनो, बाहेर या आणि पाहा, शलोमोन राजा कसा मुकुटमंडित आहे ते पाहा, त्याच्या विवाहाच्या दिवशी त्याच्या आईने त्याला तो घातला आहे, त्याचे हृदय आनंदित झाले तो हा दिवस.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options