गीतरत्न ३:१-३
१
रात्रभर माझ्या अंथरुणावर मी त्याला शोधत होते ज्याच्यावर माझे हृदय प्रेम करते; मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही.
२
मी आता उठेन आणि शहरभर फिरेन, त्याच्या रस्त्यावर आणि चौकात जाऊन; माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते त्याचा मी शोध करेन. मग मी त्याला शोधले परंतु तो सापडला नाही.
३
जे पहारेकरी नगरात गस्त घालतात त्यांना मी आढळले तेव्हा मी त्यांनाच विचारले, मी त्यांना विचारले, “माझे हृदय ज्याच्यावर प्रेम करते, तो तुम्हाला दिसला काय?”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.