Skip to content
स्तोत्रसंहिता ९६:१०-१३

प्रभू राज्य करतो व न्याय करण्यास येतो

स्तोत्रसंहिता ९६:१०-१३
१०
राष्ट्रांमध्ये म्हणा, “याहवेह राज्य करतात.” सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही सर्व लोकांचा ते न्यायीपणाने न्याय करतील.
११
आकाशे हर्ष करो, पृथ्वी उल्लास करो; सागर व त्यातील सर्वकाही त्यांच्या गौरवाची गर्जना करोत.
१२
शेते व त्यातील सर्वकाही अति आनंदाने नाचू लागोत; वनातील सर्व झाडे हर्षाने गुणगान करो.
१३
सर्व सृष्टी याहवेहच्या सानिध्यात उल्हासित होवो, कारण ते येत आहेत, पृथ्वीचा न्याय करण्यास ते येत आहेत; ते धार्मिकतेने राष्ट्रांचा व विश्वासूपणाने लोकांचा न्यायनिवाडा करतील.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.