आजूबाजूच्या संदर्भासह वचन १ दाखवत आहे.
१
याहवेह, सूड घेणारे परमेश्वर आहेत, हे सूड घेणारे याहवेह, प्रज्वलित व्हा.
२
पृथ्वीच्या न्यायाधीशा उठा; गर्विष्ठांचा यथार्थ सूड घ्या.
३
याहवेह, कुठवर दुष्कर्मी, हे दुष्ट कुठवर जयोत्सव करणार?
४
ते उन्मत्त शब्दांचा वर्षाव करतात; सर्व दुष्कर्मी बढाईखोरीने भरलेले आहेत.