५
तुला अंधकाराच्या आतंकाचे भय वाटणार नाही, किंवा दिवसा सुटणार्या बाणांचेही नाही.
६
अंधारात दबा धरून राहणार्या मरीचे, किंवा भर दुपारी येणार्या आपत्तीचेही भय वाटणार नाही.
७
हजार लोक तुझ्याजवळ पडले, आणि दहा हजार तुझ्या उजव्या बाजूला पडले, तरी ती संकटे तुझ्या जवळदेखील येणार नाहीत.