स्तोत्रसंहिता ८९:१६-२१
१६
तुमच्या नामाची प्रशंसा ते दिवसभर आनंदाने करतात; आणि तुमच्या नीतिमत्तेचा उत्सव साजरा करतात.
१७
तुम्हीच त्यांचे गौरव व सामर्थ्य आहात; तुमच्या कृपेद्वारे आमचे शिंग उच्च केले जाईल.
१८
खरोखर याहवेहच आमची संरक्षक ढाल आहेत, आणि आमचा राजादेखील इस्राएलचे पवित्र परमेश्वरच आहेत.
१९
एकदा एका दृष्टान्ताद्वारे तुम्ही आपल्या भक्तांशी बोललात: “एका वीर योद्ध्याला मी सामर्थ्याने परिपूर्ण केले आहे; मी सामान्य लोकातून एक तरुण निवडला आहे;
२०
तो माझा सेवक दावीद, मला मिळाला आहे; माझ्या पवित्र तेलाने मी त्याचा अभिषेक केला आहे.
२१
माझे बाहू त्याला स्थिर करतील; निश्चितच माझे हात त्याला बळकट करतील.
Settings