स्तोत्रसंहिता ७४:१०-१३
१०
हे परमेश्वरा, किती वेळ शत्रू तुमचा उपहास करणार? तुमच्या नावाची निंदा शत्रू सर्वकाळ करणार काय?
११
तुम्ही आपला हात, आपला उजवा हात का आवरून धरला आहे? आपल्या वस्त्रांमध्ये लपलेला हात बाहेर काढा आणि तुमच्या शत्रूचा संहार करा!
१२
परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात; पृथ्वीवर तारणाचे कार्य करणारे तुम्हीच आहात.
१३
तुम्हीच आपल्या शक्तीने समुद्र दुभागले; तुम्हीच जलाशयातील प्रचंड प्राण्यांची मस्तके फोडली.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.