स्तोत्रसंहिता ५०:३-६
३
आमचे परमेश्वर येतील आणि ते स्वस्थ राहणार नाहीत; त्यांच्याभोवती खवळलेले वादळ व विध्वंस करणारा अग्नी आहे.
४
ते आपल्या लोकांचा न्याय करावयास येतील; आकाशाला आणि पृथ्वीला उद्देशून ते हाक मारतात:
५
“त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा, ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार स्थापित केला.”
६
आणि आकाश त्यांचे नीतिमत्व जाहीर करते, कारण ते न्यायी परमेश्वर आहेत. सेला
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.