Skip to content
स्तोत्रसंहिता ३४:१५-२०

स्तोत्रसंहिता ३४:१५-२०

१५
याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.
१६
परंतु जे वाईट करतात, याहवेहचे मुख त्यांच्याविरुद्ध आहे, त्यांची नावे ते पृथ्वीवरून पुसून टाकतात.
१७
याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून, त्यांना सर्व संकटामधून सोडवितात.
१८
याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.
१९
नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही, परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात.
२०
ते त्याच्या प्रत्येक हाडांचे रक्षण करतात, त्यातील एकही मोडणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options