स्तोत्रसंहिता २८:१-५
१
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.
२
मी पवित्रस्थानाकडे माझे हात उंच करतो; साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो; माझी दयेची आरोळी ऐका.
३
दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.
४
जे शासन त्यासाठी उचित आहे, ते त्यांना पुरेपूर करा; त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा; त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा.
५
कारण याहवेहच्या महान कृत्यांचे व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. याहवेहच त्यांचा नाश करतील. मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही.
Settings