स्तोत्रसंहिता २०:१-५
१
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.
२
त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.
३
तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला
४
तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.
५
तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू. याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत.
Settings