स्तोत्रसंहिता १४५:१४-२०
१४
याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात.
१५
सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता.
१६
तुम्ही आपला हात उघडता आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.
१७
याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.
१८
जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.
१९
त्यांचे भय बाळगणार्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात; त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात:
२०
जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात, परंतु ते सर्व दुष्टांचा नायनाट करतील.
Settings