Skip to content
स्तोत्रसंहिता १३२:१३-१७

स्तोत्रसंहिता १३२:१३-१७

१३
कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे, आपल्या निवासस्थानासाठी त्यांची ही अभिलाषा आहे, ते म्हणतात,
१४
“हे माझे कायमचे विश्रांतीचे स्थान आहे; मी येथे विराजमान होईन, कारण येथेच राहण्याची माझी इच्छा आहे.
१५
मी या नगरीची भरभराट करेन; तिच्यातील गरिबांना अन्न देऊन तृप्त करेन.
१६
तेथील याजकांना तारणाची वस्त्रे नेसवेन, तेथील भक्त आनंदाने सदैव जयजयकार करतील.
१७
“येथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल आणि आपल्या अभिषिक्तासाठी मी एक दीप स्थापित करेन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options