स्तोत्रसंहिता ११९:१-८
१
ज्यांचे मार्ग निष्कलंक असतात, जे याहवेहच्या नियमानुसार आचरण करतात, ते सर्वजण धन्य होत.
२
जे मनःपूर्वक त्यांचा शोध घेतात— आणि याहवेहचे अधिनियम पाळतात, ते सर्वजण धन्य होत.
३
ते अनीती न करता त्यांच्या मार्गाने चालतात.
४
तुमचे नियम पूर्णपणे पाळले जावेत, म्हणूनच ते तुम्ही योजलेले आहेत.
५
अहा, तुमचे नियम पाळण्यास माझे आचरण नेहमी स्थिर असते तर किती बरे झाले असते!
६
मी तुमचे नियम पाळले, तर माझी फजिती होणार नाही.
७
जेव्हा मी तुमच्या सर्व धार्मिक नियमांचे पालन करेन, तेव्हा सात्विक हृदयाने तुमचे उपकारस्मरण करेन.
८
मी तुमच्या विधींचे पालन करेन; माझा पूर्णपणे त्याग करू नका.
Settings