Skip to content
स्तोत्रसंहिता ११५:१२-१८

आशीर्वादाची खात्री व अखंड स्तुती

स्तोत्रसंहिता ११५:१२-१८
१२
याहवेह आमची आठवण ठेवतात, ते आम्हाला आशीर्वाद देतील: ते इस्राएली लोकांना आशीर्वाद देतील, ते अहरोनाच्या वंशजांना आशीर्वाद देतील,
१३
आणि जे याहवेहचे भय बाळगतात त्यांना आशीर्वाद देतील— सर्व लहानथोरांना एकसमान.
१४
याहवेह तुम्हाला समृद्ध करो, तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांनाही.
१५
याहवेह, ज्यांनी आकाश व पृथ्वी निर्माण केली तेच, तुम्हाला आशीर्वादित करोत.
१६
सर्वोच्च स्वर्ग याहवेहचा आहे, परंतु त्यांनी पृथ्वी मानवजातीला दिलेली आहे.
१७
मृतक व चिरनिद्रा घेणारे, याहवेहची स्तुतिस्तोत्रे गात नसतात.
१८
परंतु आम्हीच याहवेहची स्तोत्रे गातो, आता आणि सदासर्वकाळ. याहवेहचे स्तवन करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options