Skip to content
स्तोत्रसंहिता १०६:७-१३

स्तोत्रसंहिता १०६:७-१३

७
जेव्हा ते इजिप्तमध्ये होते, तेव्हा तुम्ही केलेल्या अद्भुत चमत्कारांकडे त्यांनी लक्ष दिले नाही; तुम्ही केलेली अनेक दयाळूपणाची कृत्ये ते विसरले; उलट, तांबड्या समुद्राकाठी त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले.
८
तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले.
९
तांबड्या समुद्राला दरडावताच तो कोरडा झाला; वाळवंटातून चालत असल्यासारखे त्यांना खोल समुद्रातून चालविले.
१०
त्यांना त्यांच्या शत्रूपासून सोडविले; शत्रूंच्या अधिकारातून त्यांची सुटका केली.
११
त्यांच्या शत्रूंना जलसमाधी मिळाली; त्यापैकी एकजणही वाचला नाही.
१२
तेव्हा लोकांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला, व त्यांचे स्तुतिगान केले.
१३
परंतु त्यांनी केलेले कार्य ते लवकर विसरले, त्यांनी केलेली योजना पूर्ण होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options