स्तोत्रसंहिता १०४:३३-३५
३३
मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन; माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन.
३४
माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो, कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे.
३५
सर्व पातकी पृथ्वीवरून नष्ट होवोत; दुष्ट परत न दिसोत. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. याहवेहचे स्तवन कर!