स्तोत्रसंहिता १०४:२५-२७
२५
एकीकडे प्रचंड व विस्तृत महासागर पसरलेला आहे; त्यात लहानमोठ्या अशा असंख्य प्राण्यांची रेलचेल आहे.
२६
यात जहाजांचे दळणवळण होत असते, आणि यात क्रीडा करण्यासाठी तुम्ही लिव्याथान निर्माण केला.
२७
निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी, प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो.