Skip to content
स्तोत्रसंहिता १०४:१०-१३

स्तोत्रसंहिता १०४:१०-१३

१०
त्यांनी खोर्‍यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.
११
ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात; त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात.
१२
आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात; व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात.
१३
ते त्यांच्या भवनाच्या वरच्या कक्षातून पर्वतावर पाऊस पाडतात; पृथ्वी त्यांच्या फलवंत कार्याने समाधान पावते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options