नीतिसूत्रे ७:१०-१६
१०
तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती.
११
(ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत;
१२
आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्यावर ती लपून बसते.)
१३
तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली:
१४
आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.
१५
म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!
१६
मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे.
Settings