Skip to content
नीतिसूत्रे ३०:१०-१४

चार दुष्ट पिढ्या

नीतिसूत्रे ३०:१०-१४
१०
दासाविरुद्ध त्याच्या धन्याकडे निंदानालस्ती करू नका; असे केल्यास तो तुम्हाला शाप देईल आणि तुम्ही दोषी ठराल.
११
असे काही लोक आहेत जे त्यांच्या वडिलांना शाप देतात, आणि त्यांच्या मातांनाही धन्यता देत नाहीत.
१२
जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते;
१३
काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात, ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात;
१४
पृथ्वीवरील गरिबांना आणि मानवजातीतील गरजूंना गिळंकृत करण्यासाठी, त्यांचे दात करवतीसारखे आहेत, आणि ज्यांच्या जबड्यामध्ये चाकू ठेवलेले आहेत.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.