नीतिसूत्रे १५:१-४
१
कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.
२
सुज्ञाची जिव्हा ज्ञानाने सुशोभित असते, परंतु मूर्खाचे तोंड मूर्खपणाच ओकते.
३
याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते.
४
सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.