गणना ८:११-१३
११
अहरोनाने इस्राएली लोकांच्या वतीने हेलावणीचे अर्पण म्हणून लेव्यांना याहवेहसमोर सादर करावे, म्हणजे ते याहवेहची सेवा करण्याकरिता तयार होतील.”
१२
मग लेव्यांनी गोर्ह्यांच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत, त्यातील एक गोर्हा याहवेहला पापार्पण म्हणून अर्पण करावा आणि दुसरा लेव्यांसाठी प्रायश्चित म्हणून होमार्पण करावा.
१३
मग तू लेव्यांना अहरोन आणि त्याच्या पुत्रांसमोर उभे करावे आणि त्यांना हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहला सादर करावे.
Settings