Skip to content
गणना ७:४२-४७

गणना ७:४२-४७

४२
सहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले.
४३
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
४४
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
४५
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;
४६
पापार्पणासाठी एक बोकड;
४७
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options