गणना ४:३४-३७
३४
मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.
३५
सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास जे सर्व तीस ते पन्नास वर्षे वयाचे पुरुष आले होते,
३६
त्यांची संख्या कुळांनुसार 2,750 होती.
३७
सभामंडपात सेवा करणार्या सर्व कोहाथी कुळाची ही एकूण संख्या होती. मोशेद्वारे याहवेहने आज्ञा दिल्यानुसार मोशे आणि अहरोनाने त्यांची गणती केली.
Settings