गणना ३:३३-३९
३३
महली व मूशी हे कुळे मरारीपासून होते. ही मरारी कुळे होती.
३४
एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या सहा हजार दोनशे होती.
३५
अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.
३६
मरारी लोकांची नेमणूक निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, बैठका, त्याची सर्व उपकरणे आणि त्यांच्या वापरा संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी,
३७
तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्या यावर करण्यात आली होती.
३८
मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.
३९
याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशे व अहरोन यांनी लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार एक महिन्याचे व अधिक वयाचे पुरुष यांची गणती केली, ते एकूण 22,000 होते.
Settings