२६
“ ‘पाचव्या दिवशी नऊ गोर्हे, दोन मेंढे व एक वर्षाची चौदा कोकरे अर्पावी. हे सर्व निर्दोष असावेत.
२७
गोर्हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.
२८
नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.