Skip to content
गणना २८:२६-३१

सप्ताहांच्या सणाचे अर्पण

गणना २८:२६-३१
२६
“ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका.
२७
याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्‍हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा.
२८
प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्‍ह्याबरोबर दोन दशांश;
२९
आणि सात कोकर्‍यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.
३०
तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा.
३१
नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options