गणना २८:२४-२९
२४
अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत.
२५
सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.
२६
“ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका.
२७
याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा.
२८
प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्ह्याबरोबर दोन दशांश;
२९
आणि सात कोकर्यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे.
Settings