Skip to content
गणना २८:१-८

गणना २८:१-८

याहवेहने मोशेला म्हटले,
“इस्राएली लोकांना ही आज्ञा दे व त्यांना सांग: ‘तुम्ही मला नेमलेल्या वेळी मला आवडेल असे सुवासिक अन्नार्पण मला निश्चितपणे सादर करावे.’
त्यांना सांग: ‘जे अन्नार्पण तुम्ही याहवेहला सादर करावे ते हे: एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, जी दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून अर्पण करावी.
एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.
त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे.
सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे.
त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्‍याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे.
दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options