Skip to content
गणना २७:१२-१४

मोशेला आपल्या मृत्यूची सूचना

गणना २७:१२-१४
१२
नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “या अबारीम डोंगरावर जा आणि जो देश मी इस्राएली लोकांना दिला आहे तो पाहा.
१३
तो पाहिल्यानंतर, जसा तुझा भाऊ अहरोन आपल्या लोकांत जाऊन मिळाला, त्याप्रमाणे तू सुद्धा आपल्या लोकांना जाऊन मिळशील.
१४
कारण सीन रानात पाण्याजवळ जेव्हा इस्राएली लोकांनी बंड केले, त्यावेळी त्यांच्या नजरेपुढे मला पवित्र म्हणून मानण्यास नाकारून तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेचा भंग केला.” (हेच सीन रानातील, कादेश येथील मरीबाहचे पाणी.)
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options