Skip to content
गणना १७:३-८

गणना १७:३-८

लेवी वंशाच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण प्रत्येक पूर्वजांच्या गोत्राच्या पुढार्‍याची एक काठी असावी.
सभामंडपात जिथे मी तुझी भेट घेत असतो, तिथे कराराच्या नियमाच्या कोशापुढे त्या काठ्या ठेवाव्या.
ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”
म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्‍यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती.
मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.
दुसर्‍या दिवशी मोशे मंडपात गेला आणि अहरोनाची काठी जी लेवी वंशाच्या वतीने ठेवली होती, ती केवळ अंकुरितच नव्हे तर त्याला कळी आली असून तिच्यावर बदाम पिकलेले दिसले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options