Skip to content
गणना १:१-१६

गणना १:१-१६

इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:
“संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.
तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी.
प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.
“तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;
शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;
यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;
जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;
१०
योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;
११
बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;
१२
दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;
१३
आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;
१४
गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;
१५
नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”
१६
हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options