Skip to content
मीखाह ३:१-४

भ्रष्ट नागरी पुढाऱ्यांवरील आरोप

मीखाह ३:१-४
तेव्हा मी म्हणालो, याकोबाच्या पुढार्‍यांनो, इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका. तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय,
तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता; तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता, आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता;
तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांची कातडी सोलता आणि त्यांची हाडे मोडता, आणि पातेल्यात शिजविण्यासाठी मांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता.
मग ते याहवेहचा धावा करतील, पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही. त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे याहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options