लेवीय ८:१-४
१
याहवेह मोशेला म्हणाले,
२
“अहरोन आणि त्याच्या पुत्रांना, त्यांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल, पापार्पणासाठी एक गोर्हा, दोन मेंढे आणि टोपलीभर बेखमीर भाकरी घेऊन ये,
३
आणि सर्व लोकांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र कर.”
४
याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि सर्व लोक सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले.
Settings