Skip to content
लेवीय ६:१७-२३

लेवीय ६:१७-२३

१७
तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे.
१८
अहरोनाच्या संतानांतील फक्त पुरुषांनी ते खावे आणि याहवेहला अर्पिलेला अन्नार्पणाचा हा भाग त्यांच्यासाठी पिढ्यान् पिढ्या कायमचा वाटा राहावा. जे कोणी यास स्पर्श करतील, ते पवित्र गणले जातील.”
१९
याहवेह मोशेला हे देखील म्हणाले,
२०
“ज्या दिवशी अहरोन व त्याच्या पुत्रांचा याजकीय सेवेसाठी अभिषेक होईल, त्या दिवशी त्यांनी एफाचा दहावा हिस्सा उत्तम सपीठ, अर्धे सकाळी व अर्धे सायंकाळी, अन्नार्पण म्हणून नेमाने याहवेहला अर्पावे.
२१
ते अन्नार्पण तव्यावर तेलात चांगले परतावे आणि मग याहवेहला अर्पण म्हणून आणावे, कारण हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असे अर्पण आहे.
२२
त्याच्या पुत्रांपैकी जो पुत्र त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून नियुक्त होईल तो ते तयार करेल. याहवेहचा हा वाटा सर्वकाळचा आहे आणि तो पूर्णपणे जाळून टाकावा.
२३
याजकाचे प्रत्येक धान्यार्पण पूर्णपणे जाळून टाकले जाईल; ते खाऊ नये.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options