लेवीय ६:१०-११
१०
नंतर याजकाने त्याची तागमिश्रित वस्त्रे, त्याचबरोबर त्याची अंतर्वस्त्रे अंगावर घालावी आणि वेदीवरील अग्नीत भस्म झालेली होमार्पणाची राख काढावी आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी.
११
मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी.