Skip to content
लेवीय २६:१९-२९

लेवीय २६:१९-२९

१९
मी तुमच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा करेन आणि तुमचे आकाश लोखंडासारखे व पृथ्वी कास्यासारखी करून टाकेन.
२०
तुमची मेहनत व्यर्थ गोष्टींमुळे नाश पावेल, कारण तुमची जमीन पिके देणार नाही व तुझ्या देशातील झाडांना फळे येणार नाहीत.
२१
“ ‘इतके झाल्यानंतरही तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझे ऐकले नाही, तर मी तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट पीडा आणेन.
२२
मी तुमच्यावर जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुमच्या लेकरांना उचलून नेतील, गुरांचा नायनाट करतील आणि तुमची संख्या कमी करतील; आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओसाड होतील.
२३
“ ‘एवढे करून सुद्धा तुमच्यात सुधारणा झाली नाही आणि माझ्याविरुद्ध तुम्ही वागत राहिलात,
२४
तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन.
२५
माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल.
२६
मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.
२७
“ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल,
२८
तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन.
२९
तुम्ही तुमच्या पुत्रांचे व तुमच्या कन्यांचे मांस खाल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options