Skip to content
लेवीय २४:१९-२०

लेवीय २४:१९-२०

१९
जो कोणी आपल्या शेजार्‍याला दुखापत करतो, त्याला त्याच प्रकारे दुखापत केली पाहिजे:
२०
हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात. ज्याप्रमाणे त्याने एखाद्या व्यक्तीला दुखापत केली आहे, त्यालाही निश्चित तीच दुखापत झाली पाहिजे.

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • अनुवाद १९:२१

    खोट्या साक्षीदाराला तुम्ही दया दाखवू नये: जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय.
    वचन १९ मधून
  • मत्तय ५:३८

    “ ‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात,’ असे म्हटलेले तुम्ही ऐकले आहे,
    वचन १९ मधून
  • मत्तय ७:२

    कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.
    वचन १९ मधून
  • निर्गम २१:२३

    परंतु इजा जर गंभीर आहे, तर तुम्ही जिवाबद्दल जीव,
    वचन २० मधून
  • निर्गम २१:२५

    चटक्याबद्दल चटका, जखमेबद्दल जखम किंवा इजेबद्दल इजा द्यावी.
    वचन २० मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options