Skip to content
लेवीय २१:१०-१४

लेवीय २१:१०-१४

१०
“ ‘प्रमुख याजक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो याजकीय वस्त्रे घालण्यास पवित्र करण्यात आला आहे, त्याने शोक व्यक्त करण्याकरिता आपले केस मोकळे सोडू नयेत किंवा आपली वस्त्रे फाडू नये.
११
ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये.
१२
त्याच्या परमेश्वराचे पवित्रस्थान सोडू नये किंवा ते अपवित्र करू नये, कारण तो त्याच्या परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाद्वारे समर्पित करण्यात आलेला आहे. मी याहवेह आहे.
१३
“ ‘त्याने कुमारिकेबरोबरच विवाह करावा.
१४
त्याने विधवा, घटस्फोटित किंवा वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या स्त्रीसह विवाह करू नये, परंतु त्याने त्याच्या स्वतःच्याच वंशातील कुमारिकेशी विवाह करावा,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options