Skip to content
लेवीय २०:२२-२६

विभक्त राहण्याचा सारांश आणि बोध

लेवीय २०:२२-२६
२२
“ ‘तुम्ही माझे विधी व नियम पाळले तर मी वस्ती करून राहण्यासाठी ज्या देशात तुम्हाला नेत आहे, ती भूमी तुम्हाला बाहेर ओकून देणार नाही.
२३
ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालवून देत आहे, त्या राष्ट्रांचे रीतिरिवाज तुम्ही पाळू नयेत, कारण त्यांनी ही दुष्कर्मे केली म्हणून मला त्यांचा तिरस्कार आहे.
२४
परंतु मी तुम्हाला म्हणालो, “तुम्ही त्यांच्या देशाचे मालक व्हाल; मी तुम्हाला तो वारसाप्राप्त संपत्ती असे देईन, दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा तो देश आहे.” तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे राखणारा, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
२५
“ ‘तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, शुद्ध आणि अशुद्ध पक्षी यांच्यात स्पष्ट फरक करावा लागेल; कोणत्याही पशू, पक्षी किंवा जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका, ज्यांना मी तुमच्यासाठी अशुद्ध म्हणून वेगळे केले आहे.
२६
तुम्ही माझ्यासाठी पवित्र असावे, कारण मी याहवेह पवित्र आहे आणि तुम्ही माझे व्हावे म्हणून मी तुम्हाला इतर सर्व राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options