Skip to content
लेवीय २:१-३

सपीठ पिठाचे अन्नार्पण

लेवीय २:१-३
“ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.
आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांच्याकडे ते आणावे. याजक मूठभर पीठ आणि तेल घेतील, त्याचबरोबर सर्व धूप स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर एकत्र जाळतील, हे अन्नार्पण, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options