लेवीय १६:२०-२२
२०
“परमपवित्रस्थान, सभामंडप व वेदी यांच्यासाठी प्रायश्चित्तविधी पूर्ण केल्यानंतर अहरोनाने जिवंत बोकड आणावा.
२१
मग अहरोन आपले दोन्ही हात बोकडाच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांचे सर्व अन्याय, बंडखोरी—त्यांची सर्व पापे—त्या बोकडाच्या मस्तकावर ठेवावी व नेमलेल्या माणसाद्वारे त्या बोकडाला रानात पाठवून द्यावे.
२२
जिथे कोणी राहत नाही अशा प्रदेशात तो बोकड लोकांच्या पापाचा भार वाहून नेईल, नंतर त्या मनुष्याने त्या बोकडाला रानात सोडून द्यावे.
Settings