Skip to content
लेवीय १६:१३-१५

लेवीय १६:१३-१५

१३
तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्‍यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही.
१४
मग त्याने गोर्‍ह्याचे काही रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी दयासनाच्या पूर्वेस शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर सात वेळा शिंपडावे.
१५
“नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्‍ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options