लेवीय १५:१९-२४
१९
“स्त्री ॠतुमती होते, तेव्हा तिने विधिनियमानुसार सात दिवस अशुद्ध राहावे. त्या काळात जो कोणी तिला स्पर्श करेल, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
२०
“याकाळात ती ज्या अंथरुणावर झोपेल किंवा बैठकीवर बसेल, ती सर्व अशुद्ध होतील
२१
जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.
२२
जो कोणी तिच्या बैठकीला स्पर्श करेल त्या व्यक्तीने आपली वस्त्रे धुवावीत, स्नान करावे व तो सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.
२३
जो कोणी तिच्या अंथरुणाला किंवा बैठकीला स्पर्श करेल तो व्यक्ती सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील.
२४
“याकाळात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणारा पुरुष सात दिवस अशुद्ध राहील आणि ज्या बिछान्यावर तो झोपेल तो अशुद्ध समजावा.
Settings